प्रेम हे नावावर नसतं भाग ९ (पहिला प्रोजेक्ट) - मराठी कथा

प्रेम हे नावावर नसतं भाग ९,पहिला प्रोजेक्ट,मराठी कथा - [Prem He Navavar Nasata Part 9,Pahila Project,Marathi Katha]प्रेमाला कधीच नाव नसतं!
प्रेम हे नावावर नसतं भाग ९ (पहिला प्रोजेक्ट) - मराठी कथा | Prem He Navavar Nasata Part 9 (Pahila Project) - Marathi Katha

प्रेमाला कधीच नाव नसतं! या विचार उलगडणारी प्रेमाची गोष्ट

“अर्पिता बॉसने अर्जंट मिटिंगला बोलावलय १० मि. मध्ये सगळे बॉसच्या केबिनला जमताय लवकर चल”, शिरीन तिच्याशी बोलता बोलता सगळ्यांना बघते आणि फोने घेत ती आपल्या डेस्ककडे वळते.

अर्पिता आपला डेस्कटॉप स्लीप मोडला टाकते आणि पाणी पित आपलं लेटर पॅड घेते ग्लास खाली टेबलवर ठेवते आणि केबिनकडे वळते.

नील फेमिंग मॅक्झीनचा चीफ एडिटर यंग डायनॅमिक पर्सनॅलिटी असल्याने किती तरी मुली फिरवत असतो दर २ दिवसात कोणी नवीन मुलगी त्याचा सोबत एक फोटो पेस्ट करते कधी ऑफिस मध्ये फोने करते तेव्हा नील तासंतास बोलत असतो तर कधीतरी ऑफिस ला येतात असा हा अर्पिताचा बॉस. पण ऑफिस कलीगशी अत्यंत प्रोफेशनल वागत असतो.

अर्पिता जेव्हा केबिन पर्यंत पोहोचते दारावर नॉक करते.

“कम इन” नील आपल्या कामात बिझी असतो लॅपटॉप मध्ये काही टाईप करत असतो, तिला बघून हसत तिला बसायला सांगतो आणि परत आपल्या कामात बिझी होतं.

ती नीलच्या समोरच्या खुर्चीत बसत “गुड आफ्टरनून नील”.

“गुड आफ्टरनून स्वीटहार्ट”, नील तिच्याकडे बघत हसत लॅपटॉप बाजूला करतो.

सगळे यायची वाट बघत ते बोलत बसतात.

“काय कसं वाटतंय ऑफिस, इथलं एन्व्हायरोमेंट नीट ऍडजस्ट झालीय नं”, नील इन्फॉरमेशन घेत.

“हो, सगळे बेस्ट आहेत अगदी काहीच दिवसात सगळ फ्रेंडली झालंय. रत्नागिरीत सगळं लहान प्रमाणात होतं, पण इतकं हि नाही “अर्पिता बोलतच असते तेवढ्यात सगळे केबिनला मिटिंग करता जमतात. सगळे आपली जागा घेत बसतात शांत झालं कि सगळे एकमेकांनकडे बघत असतात नीलला बघत.

“सगळे रिलॅक्स झालेत” नील सगळ्यांना बघत.

सगळे थम्ब'स अप करत त्याला उत्तर देतातं.

“सो लेडीज अँड जेंटलमन, गुड न्युज इज आपल्या या मन्थच्या एडिशनला इंडिया त बेस्ट सेलरचा अवॉर्ड मिळालय” तो जोरात टाळ्या वाजवत सगळ्यांना बघतो.

लगेच सगळे पण रिप्लाय मध्ये जोरजोरात ओरडत टाळ्या वाजवत.

थांबा थांबा एवढच नाही तर या वार्षिचं डिसेंबर पण आपल्याच ब्रांच ला देण्यात आलाय”, म्हणत तो परत टाळ्या वाजवत.

“पण आता आपली जवाबदारी आणखीन वाढलीय सो बी सिरीयस” थोड्या नाटकीला स्वरात पण गंभीर होता तो सगळ्यांना सांगतो.

“आता या एडिशन मध्ये आपण प्रत्येक फिल्ड मधले दिग्गज यांच प्रोफाईल टाकणार आहोत आणि आता सगळ्यात महत्वाचं याची जबाबदारी लिना आणि अर्पिता दोघींच्या लीड मध्ये ठेवणार आहोत. बाकी टीम तुम्हाला सपोर्टला असतील”, नील त्या दोघींकडे बघत मग सगळ्यांना बघतो.

सगळे आनंदात असतात त्या काँग्रॅट्स करत केबिन बाहेर पडतात.

क्रमशः


ऋचा पिंपळसकर | Rucha Pimplaskar
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लेखनाची अत्यंत आवड असणाऱ्या ऋचा पिंपळसकर मुळात एक कम्युनिकेशन ट्रेनर म्हणुन कार्यरत आहेत यांची स्वतःची एक वेगळी लेखनशैली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.