प्रेम हे नावावर नसतं भाग १०,न्यू डिसेंबर मॅगझीन,मराठी कथा - [Prem He Navavar Nasata Part 10,New December Magazine,Marathi Katha]प्रेमाला कधीच नाव नसतं
प्रेमाला कधीच नाव नसतं! या विचार उलगडणारी प्रेमाची गोष्ट
अर्पिता जरा टेन्शनमध्ये असते पण खूप आनंदी पण लीनाला ते कळत ती तिच्या जवळ येते आणि “रिलॅक्स” म्हणत आपल्या डेस्कवर बसते. न्यू डिसेंबर एडिशनची तयारी जोरात सुरु होते. कॉफीचे कपचे कप रिकामे होतात.अनेक वेगळ्या वेगळ्या नव मॉडेलच प्रोफाइल चाळण्यात येतातं किती तरी नवे लेखक, सिंगरचे प्रोफाइल काही इंटरव्हयू घेण्यात येतातं.
आता मात्र अर्पिता घरी उशिरा यायला लागते कधीकधी तर सरळ दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त फ्रेश न् अप करता येते.
सावित्री आई आता बऱ्या झाल्या असतात त्या परत किचनची जवाबदारी सांभाळायला लागल्या असतात. अनिकेत मात्र आता अर्पिताचं इतका उशिरा पर्यंत काम करणं खाण्या पिण्याकडे लक्ष न देणं, कधीतरी ती घरी काम घेऊन यायची आणि तेव्हा सुद्धा न जेवताच झोपून जायची, दुसऱ्या दिवशी काही न खाता परत ऑफिसला जायची असे अनेक दिवस चाललं होतं हे सगळ बघून तो टेन्शन मध्ये असतो. पण अलीकडे तीच आपल्या कामाला घेऊन इतका पॅशन बघून त्याला खूप आनंद पण होत असतो.
त्या दिवशी ती रात्री उशिरा पर्यंत काम करणार होती तिच्याकडे वेळ नसतो म्हणून ती जेवायला खाली न उतरता नंतर येते येव्हढंच बोलुंन आपल्या कामात बिझी होते तिला वेळेचं पण भान नसतं ती न जेवताच झोपते. अनिकेतला हे कळतं तो दुसऱ्या दिवशी तिच्या आधी उठून नाश्ता तयार करायला सांगतो अर्पिता आणि स्वतः करता तो ते घेऊन आपल्या रूममध्ये जातो. अर्पिता पहाटे ६ - ७ च्या सुमारास झोपलेली असते म्हणून ती उठायची असते. तो रूममध्ये जातो त्याला माहित असतं की तिला उशीर होईल म्हणून ती परत काही न खाता तशीच ऑफिसला निघून जाईल म्हणून तो सगळं रूममध्ये नेतो आणि तिला उठवतो “अचल - अचल उठा मॅडम”.
अर्पिता डोळे चोळत उठते “ब्रेकफास्ट अँड हँडसम बॉय अॅट सर्विस मॅम”, म्हणत तो तिला सॅल्यूट मारतो.
ती ते बघते आणि पटकन उठते त्याला बघते आणि विचारते “हे सगळं काय आहे.”
“ब्रेकफास्ट मॅम” तो टेबल वर ठेवलेल्या ब्रेकफास्टकडे हात करतो.
ती ते बघते आणि बेडवरून उठत खाली उतरते. तो तिला फ्रेश न् अप करण्यास सांगतो आणि स्वतः टेबलेकडे जातो.
ती ब्रश करत स्वतःला आरश्यात बघत हसते.नंतर ती बाहेर येते आणि ते दोघं सोबत ब्रेकफास्ट ला बसतात.
“बिझी असणं छान असतं पण आपल्या तब्बेतीची काळजी पण घ्यावी”, अनिकेत चहा चा घुट घेतं. ती हसते आणि त्याला बघते” आज ब्रेकफास्ट रूम मध्ये... आणि तो पण तुम्ही का आणलात मुरारी ला सांगितलं असतं तर”
“का मी चांगल काम नाही का करत?” आणि तिच्या कडे हसत बघतो.
ती हसते “अरे तस नाही मी सहज म्हंटलं तुला पण ऑफिस ला जायच असेल ना,उशीर नाही का होणार तुम्हाला.”
“इट्स ओ के, काल तू रात्री न जेवताच झोपली त्यात उठायला उशीर झाला म्हणून.सध्या तु नाश्ता न करताच जातेय न, आज हि तू तेच केल असतं म्हणून मी आणलं”, अनिकेत तिला बघत.
ती हसते दोघं सोबत चहा नाश्ता करतात.मग ती उशीर होईल म्हणून पटकन अंघोळीला जाते.
“थँक यु” ती हसत त्याला बघते.
तो मान हलवत तिला बघत असतो आणि लवकर आटोप म्हणून सांगतो.ती तयार होते आणि ऑफिस ला जाते, दुपार होते तिचा फोन वाजतो ती बघते अनिकेत असतो ती उचलते "हॅलो, काय झालं?'
“जेवण झालं?” अनिकेत विचारतो.
“नाही वेळ नाही मिळाला पण आता जाते " ती उतरते.
“बर मी आलोय खाली तुझं लंच घेऊन, घे नाही तर सोबत करूया जर तुला चालेल तर " अनिकेत तिला बोलत.
ती ते ऐकते आणि लगेच खाली उतरते ऑफिस बाहेर येते तर तो तिथे नसतो ती त्याला फोन करते कुठेय उगाच थट्टा करताय ना माझी” अर्पिता उगाच खोटा राग- येण्याचा आव आणत.
“अगं हो थांब मी तेच सांगणार तेवढ्यात तू फोन ठेवला, तिथेंच ये जिथे मी तुला सोडल पहिल्या दिवशी” तो तिला उत्तर देतो.
ती त्याच म्हणणं एकत तिथे जाते तिला त्याची गाडी दिसते ती खिडकी ची काच खाली होते तो आत असतो “तुम्ही अजून जेवण नाही केलं, का?”
“तुझी वाट बघत होतो मला वाटलं तुला सकाळी नाश्ता दिला तर आता तू जेवण देशील म्हणून वाट बघत होतो” तो उगाच तिला छळत.
ती हस्ते आणि ते दोघे जेवायला जवळच्या रेस्टोरंट ला जातात.जेवण आटपून तो तिला परत ऑफिस ला सोडतो आणि आपल्या ऑफिस ला परत जातो.
आता मात्र ते दोघं बऱ्या पैकी एकमेकांसोबत वेळ घालवत.कितीदा तरी ते दोघे डिनर पण सोबत रूम मधेच घेत ती किती तरी पॉईंट वर त्याचा शी डिसकस करायची तो पण तिच्या कामात तेवढंच इंट्रेस्ट घेऊन ते दोघे डिसकस करायचे.तिच्या कामात तो तिला सजेशन पण द्यायचा ती पण त्या सजेशन ला मनापासन ऐकायची आणि त्यावर काम करायची.
ह्या मुळे दोघां मधली जवळीकता वाढू लागली.त्याची तिची काळजी घेणं तिला आवडायला लागलं.
तसेच तिच्याशी होणाऱ्या गप्पा गोष्टी त्याला पण हव्या हव्याश्या वाटू लागल्या.
आता कित्येकदा ते दोघे लंच एकत्र घेऊ लागलेत बाहेर डिनर ला जाऊ लागलेत.
क्रमशः
अभिप्राय