तशी कधी वेळ आली नाही, अवती भवती जवळ कोणी तरी असायचं
तशी कधी वेळ आली नाही, अवती भवती जवळ कोणी तरी असायचंमाहित नव्हतं असं कधी एकटंच राहायचं
कधी आनंद आणि कधी काळी निराशा ही यायची
शब्दांना ही आता शब्दांची लाज वाटायला लागायची
काहीतरी करावं चांगलं, काहीतरी मनासारखं लिहावं
असं सारखं वाटतंय शब्दांना येईल ही आळस खरं, पण त्यांचं काय जातंय
हल्ली प्राईम, नेटफ्लिक्सची सवय तशी मोडली गेली होती
कोणताही पिक्चर बघितला तरी सगळी सारखीच वाटत होती
का असं आता सगळं अचानक बदललं गेलं होतं
ऊन सावली असते असं फक्त ऐकण्यात आलं होत
पण तरीही काहीही होवो एकट्यानं राहण्याची ती तयारी झाली होती
जशी शब्दांचीच शब्दांशी नाती जुळली गेली होती
आला राग तरी शब्दांतच आपल्या तो मांडायचा
आनंद झाला तर तो मोकळ्या मनाने लिहून दाखवायचा
वाचणारं आणि लिहणारं ऐकच व्यक्तिमत्त्व होतं
पण शेवटी काय आता एकटच राहायचं ठरलं होत
काहीतरी नवीन करण्याची ती लागलेली ओढ कदाचित न पुसल्या जावी
एकटं राहून मजा करण्यात ती सगळीच कधी न पूर्ण व्हावी
पुढे होईल काय याचा विचार करत ही वेळ अशीच नाही घालवायची
एकटंच का होईना थोडक्यात पार्टी अनोख्या शब्दांचीच करायची
आता कळून चुकलं होत सोबत कदाचित कोणी नसेल
पण प्रश्न असा की, ही वेळ अशी का आली असेल?
उत्तर तरी सहज सरळ देणारं कोण तिथे असं उपस्थित असतं
सहजच उत्तर मिळणार असतं तर मग जीवन कोणी जगलंच नसतं
शब्दांचे असे असंख्य खेळ मनाच्या त्या मागच्या घरात आता रोजच सुरू राहतील
एकटं राहून का ते संपूर्ण खेळ खेळून जातील
शक्य होईल नाही होईल याचा विचार त्याच शब्दांनी शब्दांचा करावा
असं काय लिहावं आता आणखी किती त्रास त्या कागदाला अन् पेनाला द्यावा