
साध्याश्या वेषात उच्चकोटीचे संस्कार जपणारे गुरुवर्य नाही बर विसरलो आम्ही शाळेला संसाराच्या राहाटगाडग्यात अन् जग राहाटीत आज ही जपलंय तुम्हाला आज ही वाटतं त्या पोक्त अन् श्रेष्ठ खोडाना घरी बोलावावं साऱ्या आठवणी जागवाव्यात कधी रागीट नजर तर कधी संस्कारांची केलेली खैरात सारं सारं अश्रूंनी मोकळं करावं अन् ऋण व्यक्त करावं घ्यावा सरांना शर्ट पॅन्ट अन छान साडी बाईला सांगावी आपली प्रगती अन द्याव सारं श्रेय त्यांना घ्या वित टवटवीत फुलं वहावीत त्यांच्या पायावर अन् छानसं पुस्तक दयावं त्यांच्या हातावर गुरुवर्य... असं समजू नका आम्ही तुम्हाला नाही आठवत सार शिकवुनही तुम्ही आहात रिक्त तुमच्या ऋणातून होऊत का कधी आम्ही मुक्त...? म्हणूनच हे गुरुऋण झालंय व्यक्त