पाणी जीवनाचे अमृत - मराठी कविता

पाणी जीवनाचे अमृत, मराठी कविता - [Paani Jivanache Amrut, Marathi Kavita] पाणी हे जीवनाचे अमृत आहे, नको मानवा करु त्याची नासाडी.
पाणी जीवनाचे अमृत - मराठी कविता
पाणी जीवनाचे अमृत (मराठी कविता), छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह.

पाणी हे जीवनाचे अमृत आहे नको मानवा करु त्याची नासाडी नदी पात्रात टाकूनी केरकचरा प्रदुषित करीशी तु त्या पाण्याला थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ आपल्या जीवनात आचरशी पाण्याचा टाळूनी अपव्यय जल संवर्धन करीशी या पाण्याचा पाणी हे जीवनाचे अमृत आहे नको मानवा करु त्याची नासाडी जल संकट येता भटकंती होई या पाण्यासाठी पशु पक्षी व्याकुळ होती याच पाण्यासाठी पाण्याचे जतन करणे हीच काळाची गरज पाणी हे जीवनाचे अमृत आहे नको मानवा करु त्याची नासाडी

- सनी आडेकर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.