अडथळयांची शर्यंत - मराठी कविता

अडथळयांची शर्यंत, मराठी कविता - [Adthalyanchi Sharyat, Marathi Kavita] कशाला कोणा यशस्वी वाटचाल, करणार्‍याच्या वाटेत ‘अडथळे’ निर्माण करता.
अडथळयांची शर्यंत
कशाला कोणा यशस्वी वाटचाल
करणार्‍याच्या वाटेत ‘अडथळे’ निर्माण करता

जो तो पुढे वाटचाल करतो मेहेनतीने
पुढे जाण्याची उर्मी मिळते जिददीने
आत्मीय बळ मिळते त्याला चिकाटीने
दैवी साथ मिळे, ज्याला त्याला चिकाटीने

कशाला कोणा यशस्वी वाटचाल
करणार्‍याच्या वाटेत ‘अडथळे’ निर्माण करता

तुम्हीही गाठा यशाची, उंच उंच शिखरे
ठेवा सदैव स्वतावर आत्मविश्वास
आज नाही जमले, तर ऊद्या ते जमेलच
परंतु कधी नशीबाला तुम्ही दोष देऊ नका
जिद्दीने, चिकाटीने तुम्ही ज्या क्षेत्रात
जाल तिथे आपल्या कार्यांचा ठसा ऊमटवा

परंतु काटे बनून, कोणाच्या पायाला टोचू नका
यशस्वी वाटचाल करणार्‍याच्या वाटेत ‘अडथळे’ बनू नका

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.