
त्याचा मला अविरत अभिमान आहे
उंच उंच डोंगर रांगा
जणू नैसर्गिकता जपत आहे
रस्त्यांची नागमोडी वळणे
निसर्गाचा थाट सांगत आहे
खळखळ वाहती झरे
जसे वाटे सुमधूर संगीत गात आहे
पक्षी करती किलबिलाट
होऊन जाई मन प्रसन्न
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत
त्याचा मला अविरत अभिमान आहे
हापूस आंबा कोकण भूमीची
शान आहे
करवंदे, काजू, फणस
हे इथे रानमेवा आहे
कोकण भूमी अनेक
रत्नांची खाण आहे
विविधतेत एकता ही
अनेक दशके टिकून आहे
नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत
त्याचा मला अविरत अभिमान आहे