डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम - मराठी कविता

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, मराठी कविता - [Dr. A. P. J Abdul Kalam, Marathi Kavita] निर्मळ वाचा, विज्ञान भक्ती, अवकाशी प्रेरणा, प्रेमळ व्यक्ती.

निर्मळ वाचा, विज्ञान भक्ती, अवकाशी प्रेरणा, प्रेमळ व्यक्ती

निर्मळ वाचा
विज्ञान भक्ती
अवकाशी प्रेरणा
प्रेमळ व्यक्ती

विलक्षण बुद्धी
मार्मिक विचार
हाती दानत
मुखी आधार

मृदु स्वभाव
संवेदनशीलता
देश प्रेमाशी
एकनिष्ठता

कठोर परिश्रम
थोर नेतृत्व
सखोल अभ्यास
अद्वितीय कर्तुत्व

नव्या पिढीशी
विचार मंथन
स्वप्नाळू डोळ्यांना
अविरत समर्थन

या जाज्वल्य पार्वाला
भारताचा सलाम
एक महान गुरु
डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.