प्रेमाचे वादळ - मराठी कविता

प्रेमाचे वादळ, मराठी कविता - [Premache Vaadal, Marathi Kavita] ठरवून पण सहजपणे, माझ्या बाजूला बसतो, छोट्याशा विनोदावरही, जोरजोरात हसतो.

ठरवून पण सहजपणे, माझ्या बाजूला बसतो, छोट्याशा विनोदावरही, जोरजोरात हसतो

ठरवून पण सहजपणे
माझ्या बाजूला बसतो
छोट्याशा विनोदावरही
जोरजोरात हसतो

प्रेमाचे वादळ कळतंय मला
कळतंय मला हास्यात तुझ्या
काय लपून बसलंय
घाबरु नको मी ही मनात
तसच काहीसं जपलंय

प्रेमाचे वादळ न संपण्यार्‍या गप्पांचं मी
पांघरुण घेऊन निजते
तुझी हुशारी उत्तरात नाही
प्रश्नांमध्ये दिसते

प्रेमाचे वादळ आत्मविश्वासाने नटलेला
स्वभाव मोहक रहस्यमय
सारखा तुझा उल्लेख ओठी
हवीहवीशी तुझी सवय

प्रेमाचे वादळ विश्वासार्ह न्यायबुद्धी
वर्तनातही सभ्यता
हात तुझ्या हाती देता
मनी लाभली शांतता

प्रेमाचे वादळ आरशाने पहिल्यांदा माझ्या
डोळ्यात भरले काजळ
नव्हती ही झुळुक मैत्रीची
होते प्रेमाचे वादळ


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.