आयुष्याचा भागीदार - मराठी कविता

आयुष्याचा भागीदार, मराठी कविता - [Aayushyacha Bhagidar, Marathi Kavita] तिच्या दिशेने पावलं, आपोआप माझी वळतात, मलाही उमजेना अशा, वाटेला भावना कळतात.

तिच्या दिशेने पावलं, आपोआप माझी वळतात, मलाही उमजेना अशा, वाटेला भावना कळतात

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात

भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?

नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण

खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार


ऋचा मुळे | Rucha Muley
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.