ते चार दिवस - मराठी कविता

ते चार दिवस, मराठी कविता - [Te Chaar Diwas, Marathi Kavita] ते चार दिवस ‘स्व’तुन फुटलेल्या काव्याचे, समतेचे, ममतेचे, बुद्धाच्या करुणेचे.
ते चार दिवस - मराठी कविता | Te Chaar Diwas - Marathi Kavita

ते चार दिवस ‘स्व’तुन फुटलेल्या काव्याचे, समतेचे, ममतेचे, बुद्धाच्या करुणेचे आणि पिसाटलेल्या प्रतिभेचे

ते चार दिवस ‘स्व’तुन फुटलेल्या काव्याचे, समतेचे
ममतेचे, बुद्धाच्या करुणेचे आणि पिसाटलेल्या प्रतिभेचे
बलात्कारी अभिनिवेषाने ‘स्व’कडे चाललेल्या फक्त स्वतःचेच
‘स्व’नेच कपडे फेडून सारे दिलेल्या फोरासी आव्हानाचे
‘स्व’तल्याच कडूजाळ गतस्मृतींचे पडलेल्या ढसाळी खड्ड्याचे
बंध तोडण्याचे, नाकारण्याचे आणि त्यांची हड्डी ठोकण्याचे
क्रांतीगर्भ जाणीवांचे नेणीवेत फेसाळलेल्या प्रचंड थकव्याचे
खोट्या कविता जाळण्याचे धर्मांधता खलबत्त्यात फुटण्याचे
ते चार दिवस माझ्या मुंडा आयांचे, प्यालेल्या दुधाचे
त्यांनी खाल्लेल्या परवाळ पोकळ भाताचे, मिर्चीच्या अश्रूचे
रक्तात अनिवार उसळून उठलेल्या दुधप्राप्ती भानाचे
हेच दिवस खरे बोलण्याचे आणि तेच काव्यात प्रकटण्याचे
डॉक्टरांना जन्मदेव युगंधर शतकासमोर नमण्याचे
१४ एप्रिलला सलाम करण्याचे संग्रह त्याच्यापायी लावण्याचे


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.