Loading ...

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या) - श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी.

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

श्रावण माहिण्यात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक सोमवारची खुलभर दुधाची कहाणी...

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी

मराठीमाती संपादक मंडळ

ऐक परमेश्वरा सोमवारा, तुमची कहाणी, आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ति सांगितली. दवंडी पिटली, “गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं.” सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळे दूध देवळात नेलं. गावचं दूध सगळं गर्भाऱ्यात पडलं, तरी देवाचा गर्भारा भरला नाही.

दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटपलं, मुलांबाळांना खाऊं घातलं, लेकीसुनांना न्हाऊ घातलं, गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भक्तीभावानं अर्पण करते.” असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली.

इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला. हें गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले. तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस गर्भारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. “तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हायहाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणुन गर्भारा भरत नाही.” “याला युक्ति काय करावी?” “मुलावासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा; म्हणजे देवाचा गर्भारा भरेल. देव संतुष्ट होईल.” म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटविली.

चवथ्या सोमपारी राजानं पूजा केली. मुलाबाळांना गाईवासरांना दूध ठेऊन उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहातात तो देवाचा गर्भारा भरून आला. राजाला आंनद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकीसुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली.

तसं तुम्ही आम्ही नांदू. ही साठा उत्तराची कहाणी (सोमवारची खुलभर दुधाची कहाणी), पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: जो माणुस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीनें करून देवाला भजतो, तोच देवाला आवडतो.

श्रावणातल्या कहाण्या यासंबंधी महत्त्वाचे दुवे:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची