Loading ...
/* Dont copy */

सोमवारची शिवामुठीची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

सोमवारची शिवामुठीची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या) - श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी सोमवारची शिवामुठीची कहाणी.

सोमवारची शिवामुठीची कहाणी (श्रावणातल्या कहाण्या)

श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक सोमवारची शिवामुठीची कहाणी...

सोमवारची शिवामुठीची कहाणी

मराठीमाती संपादक मंडळ

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ही रानी गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जाता?” “महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानी हिला विचारलं, “तू कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.” त्यांचेबरोबर देवळात गेली.

नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय गं बायांनो वसा वसता?” “आम्ही शिवामुठीचा वसा वसतो.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमुट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्याई, गंध फूल घ्यावं, दोन बेलाची पानं घ्यावी. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चवथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामूठीकरिता घेत जावे.”

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला संगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली.

संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे?” नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.” पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. “नावडते, तुझा देव दाखव.” म्हणून म्हणू लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला.

नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, “हे असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली.

जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी (सोमवारची शिवामुठीची कहाणी). पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणातल्या कहाण्या यासंबंधी महत्त्वाचे दुवे:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची