मी आहे एक जागतिक भिक्षुक, उभ्या जगाकडं भिक मागीत हिंडणाऱ्या सम्राट देशाचा
मी आहे एक जागतिक भिक्षुकउभ्या जगाकडं भिक मागीत हिंडणाऱ्या सम्राट देशाचा
माझ्या देशात होता चंद्र चांदीचा, सूर्य सोन्याचा
सारं सारं काही होतं संपवलं तरी वाढणार
पण नव्हती केवळ माणुसकी म्हणून तर ती माणूस झालो
माणसं विद्वान शहाणी कर्तबगार
पराक्रमाची वगैरे वगैरे शर्थ करणारी अर्थातच विश्वासघातकी
ज्यांनी इमाने सेवा केली त्यांचाच बळी घेणारी, उफराटी
अर्थात सम्राट देशाचा मी गोसावी राजा झालो
पंथ होते, ग्रंथ होते, श्रीमंत होते
अवतार होते, दयावान होते, पुण्यवान होते
पण लहान मोठा ठरविणारेच होते
केवळ स्वश्रेष्टत्वाच्या नादापायी
साऱ्यांनाच कनिष्ट ठरविणारे होते
म्हणून मी ढसाळून उठलो भिक्षुक होऊन खराखुरा