चमत्कार - मराठी कविता

चमत्कार, मराठी कविता - [Chamatkar, Marathi Kavita] नित्य चमत्कार घडतात इथे, पांढऱ्या कपड्यांच्या छिनाल दुनियेत, दुटांगी धोतर आवरीत सारे.
चमत्कार - मराठी कविता | Chamatkar - Marathi Kavita

नित्य चमत्कार घडतात इथे, पांढऱ्या कपड्यांच्या छिनाल दुनियेत, दुटांगी धोतर आवरीत सारे

नित्य चमत्कार घडतात इथे
पांढऱ्या कपड्यांच्या छिनाल दुनियेत
दुटांगी धोतर आवरीत सारे
वासनेला गडबडून सलाम करतात
बायकांची ‘ट्रांसफर एन्ट्री’ करुन
बँकांचे मोठ्ठे लोन काढतात
हे मी बोलणार नव्हतो- पण काय करु?
यांनीच देवळाचा कब्जा घेतलाय
धर्माचे भाडखाव हेच बनलेत
व्यभिचाराला बगलेत आवळून
खुद्द उरस्फोटीत व्यभिचारच धावत-रडत माझ्याजवळ आला
अश्रूची टिपं ढाळून म्हणाला
बाप मांडीवर झुलत असतो
पोरगा ताटकळत खाली बसतो
पोटाला धोतराची पाठ बांधून
तो जेव्हा खाली येतो
पोरगा सरसर माडीवर चढतो
गुलछर्रे उडवून खाली येतो
ते दोघेही उद्यांच्या प्रार्थनेला
‘मुंहपट्टी’ बांधून अहिंसेचा महिमा गात असतात
पांढऱ्या दुनियेतही कधीकधी
कंगाल दारिद्र्य नजरेला भिडतं
गोऱ्या कातडीची तुपकट वासाची सोज्वळ-पोरं
शेटजीच्या पुढ्यातं वाकून बसते
जोडीला आईची संमतीही असते
दाराला कडी तो घालून विधवा
त्याच्यासाठी बाज छान सजवतते
हुंड्याचे पैसे घेऊन बरोबर
लग्नाचा मुहुर्त काढायला सांगते
लग्न आपल्या पोरीच व्हाव
म्हणून सुहागरातीला ती पोरीला धाडते
तो शेटजी दानशूर म्हणून मशहूर असतो
रंडीबाज धर्माचं तिर्थक्षेत्र
बुधवार पेठ झाल तर बिघडल कुठे ?
पण दुःख मात्र एवढच वाटतं
यात चंगळ भटाचीच घडते.
त्यांच्या यज्ञयागाला साक्षी ठेऊन
कोंडा पाखडणारे हडकुळे जीव
सुपातून कण्या काढीत असतात
दारिद्र्याला पोटात उन्हात खेळवून
पोटाचा डोंब जाळीत बसतात.


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.