जातीयवादी हरि रे ऽ - मराठी कविता

जातीयवादी हरि रे ऽ, मराठी कविता - [Jatiyawadi Hari Re, Marathi Kavita]नियत्याने हे जग निर्मियले सांगूनजाती अशी पुराणे, मग हा हरिच बाई जातीयवादी सांगू.
जातीयवादी हरि रे ऽ - मराठी कविता | Jatiyawadi Hari Re - Marathi Kavita

नियत्याने हे जग निर्मियले सांगूनजाती अशी पुराणे, मग हा हरिच बाई जातीयवादी सांगू कुणाकडे?

नियत्याने हे जग निर्मियले सांगूनजाती अशी पुराणे
मग हा हरिच बाई जातीयवादी सांगू कुणाकडे?
एकास प्रसवी बाहुतुनी
दुजास आणीक तनुतूनी
तिजास शुद्र त्या टांगेतूनी
तट्टू वशिले, समस्त बडवे कुदले पटांग मुखातुनी
मग हा हरिच बाई जातीयवादी सांगू कुणाकडे?
एकास सांगी करा पराक्रम
दुजास निवेदी पिकवा घाम
तिजास आशा शिवा ही जीवे
सोता मातुर खाई बडव्यांचे मारेल गोविंदक‍इडे
मग हरिच बाई जातीयवादी सांगू कुणाकडे?

मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.