हे क्रांतीकारी समस्त सूर्यफुलांनो! तुम्ही तर जोरकस विद्रोही सुक्ते रचायला हवीत
हे क्रांतीकारी समस्त सूर्यफुलांनो!तुम्ही तर जोरकस विद्रोही सुक्ते रचायला हवीत
वेदांग लिहिलेल्या जटाभोर मुनीच्या हौसेहुनही अधिक
स्वातंत्र्याच चंद्रमुखी झाड त्यांनीच लावलं-खाल्लं
ही मृगजळी फूले आपल्यासाठी-त्यांच्यासाठी नव्हेत.
त्यांच्या अंगणात समृद्धीचा फुलसडा पडला म्हणून
तुम्ही का हसताहात? का आनंदताहात?
अरे, ‘स्व’ची क्रूर चेष्टा थांबविण्यासाठी
तुम्ही विद्रोहाचाच जमालगोटा त्यांना खिलावला पाहिजे
त्यांच अंगण फुलसडा पाहून आनंदून-ओसंडून
समृद्धी सागराला ओलांडून केव्हाच गेलय!
तुमच्या दुःखाची कुस रोज उजवली जातेए
सांगतोय, हे बाळंतपण तुम्हाला परवडणार नाहीए
‘रोज मरे त्याला कोण रडे’ हे नितंबू भडव्यांच
गोजीर नैतंबिक तत्त्वज्ञन
डोक्यावर थोपायचा हैजडिक प्रयास पुरता थांबवा!
मशाली खांद्यावर वाचवून क्रांतीच बाशिंग
आपल्या मुर्दाड मेंदूला बांधा
आभालभर ‘येळकोट’ करुन आपल्याच वाकळीचा का होईना
पण उभा पोत नाचवा
मार्क्सने रणगाडे रस्ते आखून ठेवलेत
लेनीन बुरजावरुन तोफेला बत्ती देईल
जंगली वाघीण दुध पेताड माओ
पसरताहेत इथल्या मनामनातून
तुम्ही फक्त पोत नाचवा
भंडारा उडवायच काम आमचं!
आपणही लाल सलामी देऊ-एकमेकांना
खुशीची! क्रांतीची नी-चिरविजयी शांतीची