संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के - मराठी कविता

संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के, मराठी कविता - [Sansrutiche Aamhi Bhanang Chakke, Marathi Kavita] संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के, पाट्या टाकून पोथ्या पढतो.
संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के - मराठी कविता | Sansrutiche Aamhi Bhanang Chakke - Marathi Kavita

संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के, पाट्या टाकून पोथ्या पढतो, अन्‌ पुन्हा पुन्हा असे दचकून म्हणतो

संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के
पाट्या टाकून पोथ्या पढतो
अन्‌ पुन्हा पुन्हा असे दचकून म्हणतो
राम नाम सत्य है!
यंत्रयुगाचे गीतही गातो
देवाचे भुंडे पारणेही खातो
अन्‌ पुन्हा पुन्हा असे दचकून म्हणतो
राम नाम सत्य है!
संस्कृतीचे आम्ही भणंग छक्के
यंत्रालाही नारळ फोडून येतो
सणाला नाचून उरडून पडतो
अन्‌ पुन्हा पुन्हा असे दचकून म्हणतो
राम नाम सत्य है!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.