माझी शपथ - मराठी कविता

माझी शपथ, मराठी कविता - [Majhi Shapath, Marathi Kavita] उध्वस्त होण्यातही एक मजा असते, स्वतःचेच आसूड स्वतःवर फटकावतांना.
माझी शपथ - मराठी कविता | Majhi Shapath - Marathi Kavita

उध्वस्त होण्यातही एक मजा असते, स्वतःचेच आसूड स्वतःवर फटकावतांना

उध्वस्त होण्यातही एक मजा असते
स्वतःचेच आसूड स्वतःवर फटकावतांना
ती ही एक गोड सजा असते
मजनू होण्यात कोणती अदा असते?
Please सांगू नका कुणी कुणाला! माझी शपथ!
प्रेयसीच नादान झाली तर
मरणाचही मरण गोठून गोठून थोटं होतं
ती हुरहुर... तो क्षण आणि त्या स्मृती
काळ्याकुट्ट असल्यातरी चालतील
पण तीच नादान झाली तर?
स्मृतीच भ्रष्ट नष्ट होऊन भेगा पडतात मेंदुला
मेंदूचा मुडदा पडला तरी चालेल पण साला तो अमर आहे
भेकडांचही एक तत्त्वज्ञान असतं
राणी, तू केविलवाणी का झालीस?
ए वेडाबाई, रडतेस कशाला?
म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम/बीम आहे की काय?
‘अश्रूच्या पाटात’ प्रेमाचं कमळ! मस्त राणी मस्त!
सालं, आमचा बापजाद्यांनाही जमलं नाही
आम्ही तर कोणीच नसून असल्यासारखे केलेस
आणि प्रत्यक्ष असतानाच का बदनाम केलेस
तू रडलीस अन्‌ उध्वस्त होण्यातली मजाच गेली
‘मी तुझा परमात्मा’
भलतच काय बोलतेस
वटवट बंद कर, चल बोहल्यावर चढ
काय म्हणतेस? ‘तुला मी आजन्म विसरणार नाही’
माझं मरण मीच मरवणार आहे चल चालती हो, सुखी हो
माझा कमीत कमी ‘मजनू’ तरी करावचास
तुझ्या आसवात ‘मजनू’च कलेवर कशाला बुडवलंस
आणि असंच करायचं होतं तर लैलाच का झालीस
म्हणून तर उध्वस्त होण्यातली मजाच गेली!


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.