निमित्त गुजरात दंगलीचे - मराठी कविता

निमित्त गुजरात दंगलीचे, मराठी कविता - [Nimitta Gujarat Dangaliche, Marathi Kavita] परवा एक गोरंपान पोरगं भेटलं, फर्स्टक्लास स्कॉलर अर्थातच जाड भिंग.
निमित्त गुजरात दंगलीचे - मराठी कविता | Nimitta Gujarat Dangaliche - Marathi Kavita

परवा एक गोरंपान पोरगं भेटलं, फर्स्टक्लास स्कॉलर अर्थातच जाड भिंग

परवा एक गोरंपान पोरगं भेटलं
फर्स्टक्लास स्कॉलर अर्थातच जाड भिंग
विद्वत्ता आणि प्रतिष्ठेचं झुल अंगावरच चढवित
सोपस्काराचा आव आणून निर्मळ हसलं
गुजरात आंदोलनाचं निमित्त साधून
अन्‌ माझं ‘ब्रेनवॉशिंग’ करायला लागलं
‘सवलतींमुळे दंगल उसळली - आपलं मत?
नाही ती व्हायची होती म्हणूनच झाली’
तो स्तंभित - तरीही चाचपला
हक्कांची सनद जादा वाटली
म्हणूनच ती दंगल पेटली
पण ही जाळपोळ थांबणार कधी?
‘तुमच्याकडे पाहून थांबेल असं तुर्तास तरी नाही’
मूळ प्रश्नाला तुम्ही बगल देताहात... त्याची तक्रार
आपली ती जुनी खोड आहे हो ना!
आपला धर्म म्हणजे प्रचंड वटवृक्ष
उभ्या आडव्यांना कवेत घेणारा
अन्‌ दुःखितांचे अश्रू पिणारा... हो नाऽ
त्याने मान डोलावली... मी डोळे मिटले
हात जोड... म्हण! ... ‘सर्वेपि सुखीना सन्तु सर्वे...


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.