हेच काम मी करणार आहे - मराठी कविता

हेच काम मी करणार आहे, मराठी कविता - [Hech Kaam Me Karnar Aahe, Marathi Kavita] यत्कदाचित प्रोफेसर झालोच तर एक काम मी करणार आहे.
हेच काम मी करणार आहे - मराठी कविता | Hech Kaam Me Karnar Aahe - Marathi Kavita

यत्कदाचित प्रोफेसर झालोच तर एक काम मी करणार आहे, विद्रोहाचं ‘पाणी’ पोरांना साऱ्या ढसा ढसा मी पाजणार आहे

यत्कदाचित प्रोफेसर झालोच तर एक काम मी करणार आहे
विद्रोहाचं ‘पाणी’ पोरांना साऱ्या ढसा ढसा मी पाजणार आहे
विद्यापीठी भितीशी झुंजणारी पोरं
निस्सून बाजूला मी काढणार आहे
संस्कृतीचा तो अमूर्त किल्ला
फोडायला त्यांना मी सांगणार आहे
मलाही एक ‘डॉक्टर’ हवाय
त्यांच्यातूनच तो घडणार आहे
धावलो फुटलो तरीही चालेल
मरेमरेतो मी राबणार आहे
यत्कदाचित प्रोफेसर झालोच तर एक काम मी करणार आहे
विद्रोहाचं पाणी देता करुणामृतही त्यात मी घालणार आहे
‘स्लिव्हलेस कल्चरच्या’ वाटाऊ पोरांना
कम्युनिझम मी देणार आहे
भाकरीची वानवा कशी पसरते
हे ही त्यांना मी सांगणार आहे
मार्क्स, डॉक्टर फुले नी एंगल्स
सारे मी त्यांच्यात ओतणार आहे
धावलो फुटलो तरीही चालेल
मरेमरेतो मी राबणार आहे
यत्कदाचित प्रोफेसर झालोच तर एक काम मी करणार आहे
पोरांना संगतीला घेऊन माझ्या समतेचा सूर्य मी आणणार आहे


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.