सत्यचिंतन - मराठी कविता

सत्यचिंतन, मराठी कविता - [Satyachintan, Marathi Kavita] सोड हिंदुत्वा झंझट मनुची, सत्यचिंतनाविन मम महिमा, कशा कारणे वानी रे.
सत्यचिंतन - मराठी कविता | Satyachintan - Marathi Kavita

सोड हिंदुत्वा झंझट मनुची, सत्यचिंतनाविन मम महिमा, कशा कारणे वानी रे

सोड हिंदुत्वा झंझट मनुची
सत्यचिंतनाविन मम महिमा
कशा कारणे वानी रे
उगा करुनी तु वारी पंढरी
मुखे वाफ का दवडी रे॥ १ ॥
मुखी राम परी मनी द्वेष का
सदा करे तव वसती रे
धाऊनी येते प्रेम परी तू
घृणारंगी का रंगी रे॥ २ ॥
मला जाणीले परी मानवा
अनुभवे समृद्धी रे
कदा घेशी तू बोल दानवा
धाऊनी येतो जलदी रे ॥ ३ ॥

सोड हिंदुत्वा झंझट मनीची


मुकुंद शिंत्रे | Mukund Shintre
नाशिक, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.