Loading ...

ब्रेडची कचोरी (पाककृती)

ब्रेडची कचोरी (पाककृती) - [Bread Kachori Recipe] नेहमीच्या कचोरीपेक्षा चवीला वेगळी व झटपट घरी बनवता येणारी ब्रेडची कचोरी.

ब्रेडची कचोरी (पाककृती)

झटपट घरी बनवता येणारी ब्रेडची कचोरी


ब्रेडची कचोरी (पाककृती)

(Bread Kachori Recipe) नेहमीच्याच कचोरीपेक्षा चवीला खमंग आणि चटपटीत शिवाय झटपट घरीच बनवता येणारी ब्रेडची कचोरी.

घरातील सर्वांना तर आवडेलच मात्र खासकरून लहान मुलांना नाश्त्यामध्ये व मधल्या वेळेत खायला फारच आवडेल.



ब्रेडची कचोरी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • स्लाईस ब्रेड
  • १ नारळ
  • १ १/२ कप साखर
  • ७-८ वेलदोडे
  • १/२ चमचा रोझ इसेन्स
  • थोडासा बेदाणा

ब्रेडची कचोरी करण्याची पाककृती


  • नारळ खवून साखर घालून त्याचे सारण तयार करुन घ्यावे व साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे.
  • त्यात वेलची पूड, बेदाणा व रोझ इसेन्स घालून गार होऊ द्यावे.
  • ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.
  • नंतर वरील सारण १ चमचा घेवून ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा.
  • अशा सर्व कचोर्‍या तयार करुन ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्या वेळी तळाव्यात.

ब्रेडची कचोरी ही चिंचेची चटणी किंवा पुदिना चटणी सोबत फारच सुंदर लागते.

ब्रेडची कचोरी ही गरमा गरमच खावी, आधिच करून ठेवल्यास कचोरी नरम पडते आणि चव फारशी चांगली लागत नाही.


ब्रेडची कचोरी (पाककृती) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


सर्व विभाग / जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची