बीटाच्या वड्या - पाककृती

बीटाच्या वड्या, पाककला - [Beetachya Vadya, Recipe] जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पौष्टिक असलेल्या ‘बीटाच्या वड्या’ मुलांसोबत सर्व वयोगटातील लोकांना उपयुक्त ठरतील.
बीटाच्या वड्या - पाककला | Beetachya Vadya - Recipe

जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पौष्टिक असलेल्या बीटाच्या वड्या

‘बीटाच्या वड्या’साठी लागणारा जिन्नस

 • २ वाट्या बीटचा कीस
 • दीड वाटी साखर
 • १ वाटी दूध
 • अर्धी वाटी मिल्क पावडर
 • ३ चमचा ड्रिकींग चॉकलेट

‘बीटाच्या वड्या’ची पाककृती

 • प्रथम बीटचा कीस शिजवावा.
 • नंतर दूधाची पावडर, ड्रिकींग चॉकलेट व साखर एकत्र करून घ्या व बीटच्या किसात घालून शिजवा.
 • मिश्रण घट्ट होत आले की उतरवा.
 • डावेने व्यवस्थित घोटा.
 • घोटल्यावर त्यात थोडीशी पिठीसाखर घालून पुन्हा घोटा व तूप लावलेल्या ताटात थापा.
 • सुरीच्या सहाय्याने वड्या पाडा.
 • तयार आहेत बीटाच्या वड्या.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


1 टिप्पणी

 1. Nice
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.