अत्यंत खमंग, खुसखुशीत केक डोनट
‘केक डोनट’साठी लागणारा जिन्नस
- ३ वाट्या मैदा
- १ वाटी पिठीसाखर
- २ टेबलस्पून घट्ट वनस्पती तूप
- १ चमचा थोडी शीग लावून बेकींग पावडर
- २ टेबलस्पून दूध
- १ अंडे
- अर्धा चमचा मीठ
- १ जायफळाचा छोटा तुकडा
- ४ दालचिनीच्या काड्या
- ४ - ५ वेलदोडे
‘केक डोनट’ची पाककृती
- जायफळ, दालचिनी व वेलदोडे यांची पूड करा.
- वनस्पती तूप फेटुन घ्या. त्यात साखर घालून फेटा. नंतर त्यात अंडे घालून परत फेटा.
- आता त्यात मैदा, मीठ व वेलची पूड घाला.
- सर्व एकत्र करून जरुरीप्रमाणे दूध घालून पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवा व जाडसर पोळी लाटून डोनट कटरने कापा.
- कढईत तूप भरपूर घाला. त्यामध्ये तयार डोनटच्या पुर्या घाला.
- मिश्रणात अंडे घातलेले असल्यामुळे कढईत पुरी टाकली की थोडा फेस येतो.
- पुर्या दोन्ही बाजुंनी व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
- केक डोनट तयार आहे.
टीप: जे लोक अंडी खात नाहीत त्यांनी अंडे न घालता बेकींग पावडर जरा जास्त घालून केक डोनट करावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ