Loading ...

पुरणाची पोळी - पाककृती

पुरणाची पोळी, पाककला - [Puranachi Poli, Recipe] अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ असणाऱ्या पुरणाच्या पोळीची पाककृती.

पुरणाची पोळी - पाककला | Puranachi Poli - Recipe

सण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागते.

‘पुरणाची पोळी’साठी लागणारा जिन्नस

  • अर्धा किलो चणा डाळ
  • अर्धा किलो गूळ
  • अर्धा किलो कणीक
  • १ वाटी तेल
  • अर्धा चमचा मीठ
  • वेलची किंवा जायफळाची पूड
  • पाव किलो तांदूळ पीठ

‘पुरणाची पोळी’ची पाककृती

  • डाळ २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी.
  • शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी (कट) काढून उरलेले पाणी निघून जाईपर्यंत चांगली परतावी.
  • नंतर त्यात किसलेला गूळ घालून त्याचे पाणी होऊन ते आटेपर्यंत कोरडी करावी व पुरणयंत्रात घालून वाटावी.
  • वाटतानाच ७-८ वेलचीची पूड किंवा जायफळाची पूड घालावी.
  • त्यानंतर कणीक मैद्याच्या चाळणीने चाळून त्यात अर्धा चमचा मीठ व १ पळीभर तेल घालून कणीक सैल भिजवावी. ती भिजवून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मळावी.
  • लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा करून त्यात वाटलेल्या पुरणाचा गोळा घालून तांदळाच्या पिठावर लाटावी व मंद आचेवर भाजावी.
  • कटाच्या आमटीसोबत वाढावी.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची