प्रज्ञा वझे-घारपुरे

प्रज्ञा वझे-घारपुरे | Pradnya Vaze-Gharpure

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद


  १९८४      बंगळूर, कर्नाटक (भारत)

प्रज्ञा वझे-घारपुरे यांचा जन्म आणि शिक्षण गोव्यात झालं, लग्नानंतर गेली १५ वर्षे त्या बंगळूरला आहेत. त्यांचं शिक्षण Business Management मध्ये झालेलं आहे. ४ वर्षे कॉर्पोरेट जॉब, आणि ७-८ वर्षे लहान मुलांसाठी घरी आणि शाळेत गाण्याचे Classes त्या घ्यायच्या.

जानेवारी २०२० मध्ये, २ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लिहीलेलं ‘गुणीसोबत शिकूया’ या चित्र-कथुल्यांच्या (Illustrated Book Series) पुस्तक-मालिकेतील ‘घरी येणारी माणसं’ नावाचं पाहिलं पुस्तक लिहून त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्यांच ‘दिशां-विषयक’ असलेलं पुढचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. गेलं वर्षभर, महाराष्ट्राबाहेर वाढणाऱ्या आपल्या मराठी मुलांना, आपल्या मराठी भाषेशी जोडून ठेवण्याकरिता ‘गोष्टींच्या गावात’ नावाची ऑनलाईन कार्यशाळा त्या घेतात. या कार्यशाळेत मुलं आपल्या मराठी भाषेत मुक्तपणे गोष्टी सांगायला व नव्या गोष्टी तयार करायलाही शिकतात.

या व्यतिरिक्त २०१९ मध्ये ‘आई’ची विविध रूपं, विविध क्षमता आणि त्यांचे संघर्ष सांगणाऱ्या नऊ लघुकथांचं संकलित eBook (तुमची - माझी आई), तसंच २०२० मध्ये Unconditional Love नावाची (लघु) कादंबरी त्यांनी प्रकाशित केली आहे. Kindle आणि Google Play Books वर दोन्ही पुस्तके उपलब्ध आहेत.


    


प्रज्ञा वझे-घारपुरे यांचे लेखन    प्रज्ञा वझे-घारपुरे यांचे सर्व लेखनआमच्याबद्दल