Loading ...
/* Dont copy */

हा रस्ता अटळ आहे - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची समतेचे हा रस्ता अटळ आहे ही लोकप्रिय मराठी कविता.

हा रस्ता अटळ आहे - मराठी कविता (विंदा करंदीकर)

हा रस्ता अटळ आहे! अन्नाशिवाय, कपड्याशिवाय...

हा रस्ता अटळ आहे

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर. ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक)

हा रस्ता अटळ आहे! अन्नाशिवाय, कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको, डोळे शिव! नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास छातीमधे अडेल श्वास, विसर यांना दाब कढ माझ्या मना बन दगड! हा रस्ता अटळ आहे! ऐकू नको हा आक्रोश तुझ्या गळ्याला पडेल शोष कानांवरती हात धर त्यांतूनही येतील स्वर म्हणून म्हणतो ओत शिसे संभाळ, संभाळ, लागेल पिसे! रडणा-या रडशील किती? झुरणा-या झुरशील किती? पिचणा-या पिचशील किती? ऐकू नको असला टाहो माझ्या मना दगड हो! हा रस्ता अटळ आहे! येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात; हसतात विचकून काळे दात आणि म्हणतात, कर हिंमत आत्मा विक उचल किंमत! माणूस मिथ्या, सोने सत्य स्मरा त्याला स्मरा नित्य! भिशील ऐकून असले वेद बन दगड नको खेद! बन दगड आजपासून काय अडेल तुझ्यावाचून गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी? काय तुझे हे निःश्वास मरणा-याला देतील श्वास? आणिक दुःख छातीफोडे देईल त्यांना सुख थोडे? आहे तेवढे दुःखच फार माझ्या मना कर विचार कर विचार हास रगड माझ्या मना बन दगड हा रस्ता अटळ आहे! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा, होतील भुते या सोन्याचे बनतील सूळ सुळी जाईल सारे कूळ ऐका टापा! ऐका आवाज! लाल धूळ उडते आज त्याच्यामागून येईल स्वार या दगडावर लावील धार! इतके यश तुला रगड माझ्या मना बन दगड

विंदा करंदीकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची