Loading ...

घन आभाळीचा तडकावा: मराठी कविता (नलेश पाटील)

ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांची ‘घन आभाळीचा तडकावा’ ही मराठी कविता. मराठीमाती डॉट कॉम कविता संग्रहातील ही विशेष साहित्यकृती नक्की वाचा.

घन आभाळीचा तडकावा: मराठी कविता (नलेश पाटील)

घन आभाळीचा तडकावा, मातीस मिळावा शिडकावा...

घन आभाळीचा तडकावा

नलेश पाटील (प्रसिद्ध कवी, गीतकार, चित्रकार. मुंबई, महाराष्ट्र)

घन आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा झाडांवरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा का घनांच्या झुंडी काळ्या निळाईत त्या हरवाव्या का विजेच्या नुसत्या ओळी आभाळाने गिरवाव्या झगमगणाय्रा तड्यामध्ये घन एखादा तरी अडकावा घन आभाळीचा तडकावा... ऊन मातीवरले उचलावे सूर्यात पुन्हा ते ढकलावे आभाळ जरासे घसरावे निवांत भुईवर पसरावे मरुभूमीगत मरू लागल्या मनावरी घन धडकावा घन आभाळीचा तडकावा... चला सोडवू गुंता-गुंता कळवळणाय्रा भेगांचा सडा घालूया मातीवरती झुळझुळणाय्रा रेघांचा ध्यास लागला कुठे कुठे हा झरा मोकळा हुडकावा घन आभाळीचा तडकावा...


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची