Loading ...
/* Dont copy */

कविता - मराठी कविता (आरती प्रभू)

कविता - मराठी कविता (आरती प्रभू) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभू यांची कविता ही लोकप्रिय मराठी कविता.

कविता - मराठी कविता (आरती प्रभू)

या माझ्या अजाण कवितेचा अपमान, का करतां बाबांनो -कां?

कविता

आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक)

आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातून.

या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करतां बाबांनो -कां? प्रेम हवंय का या कवितेचं? मग ते मागून मिळणार आहे का तुम्हांला? खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी. काय काय द्याल? आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला? पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा तुमच्याच तळहातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल, पण त्यांसाठी तुमचे हात तुम्हांला चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील. कराल? माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून, दूर असतों. भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे पाणावल्यासारखे चमकतात. डडुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम. ती एका पोक्त कलेने प्रौढ होते. या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात श्यामधनांतले मंद संधिप्रकाश. वाटतं की ती आताच उभीच्या उभी निसटून जाणार आहे दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात. स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा. या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊं नका कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या. मोडून पडाल! तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी ओवून जपमाळ करावी लागेल आणि श्वासनिःश्वासांचा करावा लागेल कमंडलूः पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म, आहे तयारी? जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने; तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा, मगच पाहा तिच्याकडे डोके वर उचलून. ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना तुम्हांला सोसायच्या नाहीत. मी स्वतः पाहातोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.

आरती प्रभू यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची