Loading ...

सरणार्थ - मराठी कविता (आरती प्रभू)

सरणार्थ - मराठी कविता (आरती प्रभू) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभू यांची सरणार्थ ही लोकप्रिय मराठी कविता.

सरणार्थ - मराठी कविता (आरती प्रभू)

देवें दिलेल्या जमिनीत आम्ही, सरणार्थ आलों; शरिरेहि त्याची...

सरणार्थ

आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक)

आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातून.

देवें दिलेल्या जमिनीत आम्ही सरणार्थ आलों; शरिरेहि त्याची. दरसाल येतो मग पावसाळा: चिंता कशाला मग लाकडांची? विसरू पहातो एकेकट्याला: रांगेतल्या या व्यंगार्थ काया; पाळीत जातों सुतकें स्वतःचीं हिजडा जसा की धरि ब्रह्मचर्या. नसतेंच शब्दी कधि कांहि द्वयर्थी: टिपकागदीचे असतात डाग; दृष्टीत दाटू घननीळ येतें: तेही तमाचा असते तवंग, अगदीच कोणी रस्त्याकडेला स्वस्तांत मरतां, नयनांत दोन्ही उस्फूर्त भीती... वेळीप्रसंगी उडवीत खांदे देतोहि वन्ही. उसनी मिळाली शरिरें अम्हांला विक्रीस जोड्यांइतुकी तयार; चिंता न त्रागा... रांडेप्रमाणे नियमीत घेतों सनदी पगार. एकांतजागें मन फक्त मोनें: खडकाळिचे की काळोखकोने; सुखरूप आहों सुखरूप आम्ही सर्वांत आम्ही सर्वांप्रमाणे.

आरती प्रभू यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची