Loading ...

पाऊस - मराठी कविता (शंकर रामाणी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी, बा.भ. बोरकर आणि दा.अ. कारे यांच्या पिढीनंतरचे मराठी कवी शंकर रामाणी यांची पाऊस ही लोकप्रिय मराठी कविता.

पाऊस - मराठी कविता (शंकर रामाणी)

पाऊस, उटंगार घाटपायथ्याशी


पाऊस - मराठी कविता (शंकर रामाणी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शंकर रामाणी यांची पाऊस ही लोकप्रिय मराठी कविता.



पाऊस:
उटंगार घाटपायथ्याशी;
हिरवा कंच
झाडाझाडांतून निथळणारा;
सतारीवर विद्युतलयीत
मल्हाराची धून
इथे-तिथे
उधळल्यासारखा.

पाऊस:
घाटातला
कांबळकाळे आकाश लुचून
धुकाळ दरीत
झांजरसा,
तंद्रीतच तरंगणारा;
आषाढयात्रेच्या वाटेवर विसावून
दूरवर स्वप्नात
झांजावणारा.

पाऊस:
घाटामाथ्यावरचा
नि:शब्द,
आहे-नाहीच्या पलीकडला
अनंतगर्भ
अवकाशाला मिठी घालून
रोमारोमांत
पालवणारा सर्वत्र
पाऊस


शंकर रामाणी यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- शंकर रामाणी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची