Loading ...

किनारा - मराठी कविता (विद्याधर करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विद्याधर करंदीकर (विद्याधर सीताराम करंदीकर) यांची किनारा ही लोकप्रिय मराठी कविता.

किनारा - मराठी कविता (विद्याधर करंदीकर)

घननिळ सागराचा घननाद येत कानी


किनारा - मराठी कविता (विद्याधर करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विद्याधर करंदीकर (विद्याधर सीताराम करंदीकर) यांची किनारा ही लोकप्रिय मराठी कविता.



घननिळ सागराचा घननाद येत कानी,
घुमती दिशादिशांत लहरीमधील गाणी

चौफेर सूर्यज्वाला, वारा अबोल शांत,
कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत

आकाश तेजभारे माडांवरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

जलधीबरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती, संकेत फक्त खोटे

सानिध्य सागराचे, आकाश पांघराया,
परी साथ ना कुणाची अस्तित्व सावराया

- विद्याधर करंदीकर (विद्याधर सीताराम करंदीकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची