Loading ...

समतेचे हे तुफान उठले - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची समतेचे हे तुफान उठले ही लोकप्रिय मराठी कविता.

समतेचे हे तुफान उठले - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे...

समतेचे हे तुफान उठले

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर. ज्येष्ठ कवी, लेखक, अनुवादक आणि समीक्षक)

ऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे; समतेचे हे तुफान उठले; उठले सागरकडे हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी; शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी; हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी; ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे, तेच मराठे आम्ही; आम्ही सह्याद्रीचे सुळे; स्वराज्यातुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगना; कंकणनादा भिऊनि तयांच्या शत्रु सोडिती रणा; वीज माळुनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे ऊठ खेडुता, पुन्हा एकदा, झाडुनिया घोंगडी; ऊठ मजुरा, पुन्हा मारण्या आघाडीवर उडी; एकजूट ही पाहुन पडतील अन्यायाला तडे

विंदा करंदीकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची