Loading ...

माधुकरी - मराठी कविता (श्रीधर रानडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्रीधर रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे) यांची माधुकरी ही लोकप्रिय मराठी कविता.

माधुकरी - मराठी कविता (श्रीधर रानडे)

गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी


माधुकरी - मराठी कविता (श्रीधर रानडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्रीधर रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे) यांची माधुकरी ही लोकप्रिय मराठी कविता.



गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी

कडक उन्हाने जीव घाबरे, कपोल सुकले घर्मे भिजले
पायी चटके; तापे डोके, धापा टाकीत पळे जरी

बुरबुर लागे पाऊसधारा, चिखल माखला अंगी सारा
घट्ट तपेली, झोळी धरिली, धावत जातो घरोघरी

भणभण झोंबे वारा अंगा, बधीर गात्रे पायी भेगा
हात कापती, दात वाजती, कुडकुडतो हा घडी घडी

विटक्या अपुर्‍या मुकट्यावाचुनी, वस्त्र दुपारी अंगी कोठुनि
हि धार्मिकता लोकांकरिता, नित्य सोशितो कष्ट जरी

सण आनंदी घरोघरी जरि, नित्य कपाळी सुटे न वारी
शिळी बुरसली, खवट आंबली, अशीच नशिबी सदा भाकरी

‘उशीर’ कोठे कुठे ‘संपले’ मिळे कालवण भाग्य उदेले
नावा धरिली करी तपेली, अश्रू तोंडी, घास गिळी

झोळी थोडिहि अजुनि न भरली, शाळेची तर घंटा झाली
मुख हिरमुसले, घास कोंबले; दप्तर घेउनि पळे जरी

शिळे त्यातले रात्रीकरिता, निजे उपाशी अपुरे पडता
कुणा कळवळा येई बोला, दु:ख तयाचे अणूपरी

नंबर गेला एक खालती, जाईल नादारी ही भीती
सांजसकाळी अभ्यासच करि, फुरसत खेळा कुठे तरी

गोसावी, भट, धन्य भिकारी, तेलंग्याचे भाग्य कितीतरि
पैसा दूरच, पुस्तक धोतर, जुने द्यावया नसे घरी

निजे कुणाच्या ओटीवरती, अर्धे धोतर खाली वरती
एकच सदरा तोच उशाला; दया न येते जगा परी

यजमानाला पलंग गिरदी, आत उकडते खुपते गादी
पोटी धरुनी पाय जुळवुनी, कुडकुडतो हा रात्रभरी

पुण्यात आला अभ्यासाला, पदोपदी जग अडवी त्याला
विद्या करितो, हाल सोशितो, शूर नव्हे का खरोखरी

गरिब बिचारा माधुकरी?

- श्रीधर रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची