Loading ...

वारूळ - मराठी कविता (श्रीकृष्ण पोवळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्रीकृष्ण पोवळे यांची वारूळ ही लोकप्रिय मराठी कविता.

वारूळ - मराठी कविता (श्रीकृष्ण पोवळे)

वारूळ वारूळ, मुंग्यांचे वारूळ


वारूळ - मराठी कविता (श्रीकृष्ण पोवळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्रीकृष्ण पोवळे यांची वारूळ ही लोकप्रिय मराठी कविता.



वारूळ वारूळ
मुंग्यांचे वारूळ
कृमी-कीटकांनी
बांधिले देऊळ

मृत्तिकेचे कण
एकेक घेऊन
स्वतंत्र, दुर्गम
बांधिले भुवन

तुफान वाऱ्याला
ऊन पावसाला
द्यावया आव्हान
बांधिले कष्टून

आणि कण कण
जमविले अन्न
कष्टाळू भंगूर
क्षणायू जीवन

परंतु जीवांनो
तुम्ही वारुळात
जीवनाचे सुख
आहात भोगीत

असेल लाभत
मायेचा उबारा
आणिक संकटी
मित्रांचा निवारा

स्वातंत्र्याचे वारे
तुम्ही सेवणारे
तुम्हा कोण म्हणे
दुर्बळ बिचारे

तुमच्या मनाचे
तुम्ही मुखत्यार
वारुळात तुम्ही
स्वत:च ईश्वर

वारुळात नसे
शत्रूंना प्रवेश
सत्कारार्थ त्यांच्या
लक्षावधी दंश

परी कधी येता
सर्पाचे संकट
दुर्बळांना येई
सामर्थ्य अफाट

कोट्यावधी जीव
पडती तुटून
लक्षावधी जीव
जाती चिरडून

स्वातंत्र्याचे अंगी
संचरोनी वारे
हटविती अंती
सर्पांना माघारे

- श्रीकृष्ण पोवळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची