Loading ...
/* Dont copy */

थांब पावसा ऊन पडू दे - मराठी कविता (श्रीधर रानडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्रीधर रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे) यांची थांब पावसा ऊन पडू दे ही लोकप्रिय मराठी कविता.

थांब पावसा ऊन पडू दे - मराठी कविता (श्रीधर रानडे)

उघड पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे


थांब पावसा ऊन पडू दे - मराठी कविता (श्रीधर रानडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्रीधर रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे) यांची थांब पावसा ऊन पडू दे ही लोकप्रिय मराठी कविता.



उघड पावसा ऊन पडू दे
उडू बागडू हसू खेळू दे!

कळी उमलु दे फुला फुलू दे,
पाने वार्‍यामध्ये डुलू दे
टपटप खाली थेंब पडू दे
तालावर त्या मला नाचु दे!

पाय उठवु दे वाळूवरती
समुद्र झाला! आली भरती,
आभाळ पडे खोल खालती
डोकावुनि ढग आत पाहु दे!

उंच चालल्या घारी वरती
बगळे रांगा धरुनी उडती;
ढगात भरभर रंग बदलती
पाठशिवणिचा खेळ बघू दे!

चिमणी ओले पंख सुकविते
घरट्यामधुनी पिलू पहाते
मुंगी रांगेमधे धावते
साखर-खाऊ तिला घालु दे!

जाळी कोळ्यांची बघ भिजती
हिर्‍यासारखे थेंब चमकती;
रंग त्यावरी सुंदर खुलती
थांब पावसा हार करु दे!

बसे फुलावर फूलपाखरु
मला सांगते मौज चल करु
थांब पावसा ऊन पडू दे
गाता गाता मला खेळू दे!

- श्रीधर रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची