Loading ...
/* Dont copy */

दशरथ मांझी - माउंटन मॅन (मातीतले कोहिनूर)

दशरथ मांझी - माउंटन मॅन - मनात आणले तर सामान्य माणूस प्रेमासाठी काय करु शकतो हे दाखवून देणारे माउंटन मॅन दशरथ मांझी [Dashrath Manjhi - Mountain Man].

दशरथ मांझी - माउंटन मॅन (मातीतले कोहिनूर)

प्रेमासाठी डोंगर फोडणारा माउंटन मॅन...


दशरथ मांझी - माउंटन मॅन (मातीतले कोहिनूर)

(१४ जानेवारी १९३४ - १७ ऑगस्ट २००७) मनात आणले तर एक सामान्य माणूस प्रेमासाठी काय करु शकतो हे दाखवून देणारे माउंटन मॅन ‘दशरथ मांझी’.



सूर्य माथ्यावर आला तसा फाल्गुनी देवीने आपले रोजचे भाकरी थापण्याचे काम आवरते घेतले. एका टोपलीत आपल्या नवऱ्याचे जेवण बांधून ती घराबाहेर पडली. दशरथ, तिचा नवरा रोजंदारीवर मजुरीचे काम करत असे. सकाळपासून उन्हातान्हात राबणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या पोटात दोन ताजे घास जावेत म्हणून पोटूशी असणारी ती डोंगरदऱ्याची पर्वा न करता निघत असे. त्यादिवशी ती डोंगर चढली आणि आता वाट उतरली की समोर तिचा दशरथ तिला दिसणार होता. इतक्यात काय झाले हे तिला कळायच्या आत तिचा पाय घसरला आणि फाल्गुनी देवी गडगडत खाली आली.

बायकोचा डोळ्यादेखत झालेला मृत्यू


दशरथ आणि आजूबाजूचे गावकरी तिथे धावत गेले. घरात वीज आणि नळाला पाणी नसलेल्या त्या छोट्याशा गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असणे शक्यच नव्हते. जवळचे शहर म्हणजे गया. तिथे तिला घेऊन जायचे तर समोरचा डोंगर पार करणे गरजेचे होते अन्‌ दुर्दैवाने इतका वेळ फाल्गुनीकडे नव्हता. आपल्या बायकोचा डोळ्यादेखत झालेला मृत्यू बघून दशरथ वेडापिसा झाला. समोरचा डोंगर नसता तर कदाचित आपण तिला गया शहरापर्यंत नेऊ शकलो असतो, हा विचार त्याला रात्रंदिवस छळायला लागला आणि याच विचाराने पछाडलेल्या दशरथने एक निर्णय घेतला.

जे दुःख आपल्या वाट्याला आले ते गावातील इतर कोणाच्याही वाटायला येऊ नये यासाठी दशरथने तो डोंगर फोडायचा व त्यातून एक रस्ता शहरापर्यंत काढायचा ठरवले. यासाठी दशरथने आपल्या आयुष्याची उणीपुरी २२ वर्षे घालवली. छिन्नी व हातोडा घेऊन बिहार मधील गया शहरातील गहलौर या गावातील डोंगर त्याने फोडायला सुरवात केली. सुरुवातीला गावकऱ्यांनी त्याची चेष्टा केली पण जसजशी वर्षे गेली तसे गावकरी त्याला जेवण, पाणी आणून द्यायला लागले. आता समोरचा डोंगर फोडून रस्ता करणे हा त्याच्या जीवनाचा जणु ध्यास झाला होता.

दशरथ मागे हटला नाही


बघता बघता वर्षे गेली, ऋतू बदलले पण दशरथ मागे हटला नाही. १९६० साली हातात छिन्नी हातोडा घेतलेले त्याचे हात १९८२ ला रस्ता खोदून झाल्यावरच थांबले. डोंगर फोडून ११० मीटर लांब व ३० फूट रुंद असा रस्ता आता तयार झाला होता. पूर्वी ५५ किलोमीटर असलेली अत्री ते वजीरगंज याच्यातील दूरी या रस्त्यामुळे १५ किलोमीटरवर आली होती. आता दशरथच्या गावातील गावकरी या रस्त्याने सहज शहरात जाऊ शकणार होते.

दशरथ मांझीला आता सगळे ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळखू लागले होते. प्रसिद्ध दिग्दर्शक केतन मेहता यांनी त्याच्यावर एक चित्रपटही बनवला. त्याच्या या विलक्षण जिद्दीसाठी बिहार सरकारने २००६ च्या पद्मश्रीसाठी त्याची शिफारस केली होती तर भारतीय टपाल खात्याने दशरथला मानवंदना म्हणून सन २०१६ ला त्याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही प्रसिद्ध केले. बिहारचे त्यावेळचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांनी दशरथचा सत्कार करताना स्वतः उठून आपल्या जागेवर त्याला स्थान दिले.

शहाजहानने आपली पत्नी मुमताजच्या आठवणीत ताजमहाल सारखी वास्तू निर्माण करून आपले नाव इतिहासात कायमचे कोरले तर दशरथ मांझीने आपल्या दोन हातांनी गहलौर गावाचे वर्तमान व भविष्य घडवले. आपल्या आयुष्याची उणीपुरी २२ वर्ष डोंगराशी लढून त्याने आपले ‘माउंटन मॅन’ हे नाव सार्थ केले व मनात आणले तर एक सामान्य माणूस प्रेमासाठी काय करु शकतो, हे कृतीतून दाखवून दिले.


दशरथ मांझी - माउंटन मॅन (मातीतले कोहिनूर) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- शिल्पा इनामदार-आर्ते

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची