Loading ...

जीवन म्हणलं तर (मराठी कविता)

जीवन म्हणलं तर (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अंजली भाबट-जाधव यांची जीवन म्हणलं तर ही मराठी कविता.

जीवन म्हणलं तर (मराठी कविता)

जीवन... म्हणलं तर कटू आठवणींचा डोंगर आहे


जीवन म्हणलं तर (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘अंजली भाबट-जाधव’ यांची ‘जीवन म्हणलं तर’ ही मराठी कविता.



जीवन... म्हणलं तर कटू आठवणींचा डोंगर आहे
आणि मानलं तर सुखद क्षणांचा सागर आहे

जीवन... म्हणलं तर अडचणींचा पर्वत आहे
आणि मानलं तर संधींचा ऐरावत आहे

जीवन... म्हणलं तर रहस्यमय सारीपाट आहे
आणि मानलं तर सहज सुंदर पाऊलवाट आहे

जीवन... म्हणलं तर अपयशरूपी विष आहे
आणि मानलं तर यशरुपी पियुष आहे

जीवन... म्हणलं तर उदास मनांची मरगळ आहे
आणि मानलं तर प्रफुल्लतेचा दरवळ आहे

जीवन... म्हणलं तर धगधगता निखारा आहे
आणि मानलं तर शितल - मंद वारा आहे

जीवन... म्हणलं तर मतभेदांची जत्रा आहे
आणि मानलं तर सुसंवादमय यात्रा आहे

जीवन... म्हणलं तर शंकाकुशंकांचे मैदान आहे
आणि मानलं तर सुविचारांची खान आहे

जीवन... म्हणलं तर संकटांची दलदल आहे
आणि मानलं तर भरभराटीची मखमल आहे

जीवन... म्हणलं तर अनाकलनीय पाठ आहे
आणि मानलं तर सहज सुटणारी गाठ आहे

जीवन... म्हणलं तर अपेक्षापूर्तीचं दडपण आहे
आणि मानलं तर त्याग - प्रेम हे समीकरण आहे

जीवन... म्हणलं तर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे
आणि मानलं तर आत्मविश्वासाने खेळलेला जुगार आहे

जीवन... म्हणलं तर सूड भावनेने डागाळलेला फळा आहे
आणि मानलं तर माणुसकीने बहरलेला मळा आहे

जीवन... म्हणलं तर तिरस्काराने विणलेले जाळे आहे
आणि मानलं तर आपुलकीने भरलेले शहाळे आहे

जीवन... म्हणलं तर अथांग जलाशयात मारलेली उडी आहे
आणि मानलं तर मांगल्याची उभारलेली गुढी आहे

जीवन... म्हणलं तर आव्हानांनी भरलेली लढाई आहे
आणि मानलं तर कौतुकाने मारलेली बढाई आहे

जीवन... म्हणलं तर आप्त स्वकीय पारखण्याची कला आहे
आणि मानलं तर मनमोहक नात्यांनी गुंफलेली माला आहे
म्हणूनच...

जीवन... म्हणलं तर कधीही न उलगडणारे कोडे आहे
आणि मानलं तर खरंच तुझे थोडे आणि माझे थोडे आहे

- डॉ. अंजली भाबट-जाधव
(स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची