Loading ...
/* Dont copy */

बीज अंकुरे अंकुरे - मराठी कविता (मधुकर आरकडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मधुकर आरकडे (मधुकर पांडुरंग आरकडे) यांची बीज अंकुरे अंकुरे ही लोकप्रिय मराठी कविता.

बीज अंकुरे अंकुरे - मराठी कविता (मधुकर आरकडे)

बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत


बीज अंकुरे अंकुरे - मराठी कविता (मधुकर आरकडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मधुकर आरकडे (मधुकर पांडुरंग आरकडे) यांची बीज अंकुरे अंकुरे ही लोकप्रिय मराठी कविता.



बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात?

बीजा हवी निगराणी
हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ
त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती
चंद्र-किरणांची साथ
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात?

अंकुराचे होता रोप
होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवुन रानात
उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली
प्रकाशाचे गीत गात
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात?

नाही झाला महावृक्ष
जरी नसे कल्पतरु
फुला-फळांचा त्यावरी
नाही आला रे बहरु
क्षणभरी विसावेल
वाटसरु सावलीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात?

- मधुकर आरकडे (मधुकर पांडुरंग आरकडे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची