Loading ...

महाराष्ट्र भूपाळी - मराठी कविता (दत्तो तुळजापूरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी दत्तो तुळजापूरकर (दत्तो आप्पाजी तुळजापूरकर) यांची महाराष्ट्र भूपाळी ही लोकप्रिय मराठी कविता.

महाराष्ट्र भूपाळी - मराठी कविता (दत्तो तुळजापूरकर)

प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा


महाराष्ट्र भूपाळी - मराठी कविता (दत्तो तुळजापूरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी दत्तो तुळजापूरकर (दत्तो आप्पाजी तुळजापूरकर) यांची महाराष्ट्र भूपाळी ही लोकप्रिय मराठी कविता.



प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा
तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा

सह्याद्रिच्या सहस्र शिखरी उन्नत झालेला
गोदा कृष्णा भीमा ह्यांनी पुनीत केलेला
पश्चिम सिंधु बंधु पाठिशी पूर्वोदधि जामात
विंध्याद्रीची ऊंची लक्षी सातपुडा प्रांत

अलंकार जयाचे पैठण पंढरपूर
आळंदी, चाफळ, देहू, तुळजापूर
कि पुणे, रायगड शिवनेरी सुंदर

रजःकणाला लावुनि भाळी महाराष्ट्र देशा
तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा

वरी नाचणी भात पिकवितो कोकणचा प्रांत
गहू बाजरी कापुस शाळू देशावर होत
कांबळ खांदी वहाण पायी डोईस मुंडासे
श्यामलवर्णी सान रूप तव सोज्वळ मज भासे

ते विळे कोयते शस्त्रे ही हातिची
ती बटी ठेगणी भीमेच्या काठीची
मिळविती धुळीला कीर्ती बादशाहीची

वीरांना त्या वंदन अमुचे महाराष्ट्र देशा
तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा

वीर प्रतापी राय शिवाजी छत्रपती अमुचा
धर्म रक्षण्या एकची केला घोष स्वराज्याचा
भगवा झेंडा धन्य करी हे आनंद-वन-भुवन
स्वातंत्र्याच्या जरिपटक्याला लक्षवेळ नमन

पुण्याई पुरली शिवभुपाची पुढे
पेशवे पुण्याचे वळले अटकेकडे
साम्राज्य मराठी पसरे चोहोकडे

स्मरणे स्फुरते हृदय वाकते महाराष्ट्र देशा
तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा

भीमा वाही तिच्या सुरावर गाई जी गीत
तीच मराठी भाषा अमुची ठसली हृदयात
ज्ञानेशाची ओवी अभंगवाणी तुकयाची
श्लोक वामनी जिला भूषवी आर्या मयुराची

एकनाथ, चोखा, गोरा, ज्ञानेश्वर
रामदास, तुकया, नामा, मुक्तेश्वर
नच जात पाहतो भक्तांची ईश्वर

संतमंडळा लववू माथा महाराष्ट्र देशा
तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा

मुक्ताबाई तशी जनाई आळविते देवा
सद्भावाला सहज लाभतो मोक्षाचा ठेवा
गतवीरांची पुण्य चरित्रे गाऊनि अंगाई
बाळा करिते महाराष्ट्राची भगिनी वा आई

शोभवी अहिल्या होळकरांचे पुरी
ती सती रमा भट-वंशाला उद्धरी
स्वातंत्र्य-लक्ष्मी प्रचंड संगर करी

प्रणिपात असो ह्या देवीना महाराष्ट्र देशा
तुला प्रभाती प्रसन्न हृदये प्रणाम परमेशा

- दत्तो तुळजापूरकर (दत्तो आप्पाजी तुळजापूरकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची