Loading ...
/* Dont copy */

मराठबाणा - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची मराठबाणा ही लोकप्रिय मराठी कविता.

मराठबाणा - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

महासिंधु याला असे पाठिराखा, तसे साह्य सह्याचलाचे कडे


मराठबाणा - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची मराठबाणा ही लोकप्रिय मराठी कविता.



[वृत्त : वागीश्वरी]

महासिंधु याला असे पाठिराखा, तसे साह्य सह्याचलाचे कडे
खडे दुर्ग साल्हेर, फोंडा, परांडा, अशेरी असे दक्ष चोहींकडे
महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही, परी लोहपाणीहि अंगात या
नद्या न्हाणिती तापि, कृष्णा नि गोदा, भिमा, मांजरा, वैनगंगा तया

महात्मा खरा जो स्वधर्माभिमानी परी धर्मवेडास थारा न दे
समत्वें गुणग्राहकत्वेंच योजी स्वकीयांस जो राष्ट्रकार्यामधे
सदा वंद्य जो क्षात्रकर्मप्रणेता महाराष्ट्रसम्राट शिवाजी प्रभू
तया पूज्य ती पूज्य तत्सेवकाला न कां संतमाता महाराष्ट्रभू?

जिचा 'अमृतातेंहि जिंकील पैजा' असा बोल ये प्रत्ययाचा निका
पहा भिन्नजातीय पुष्पाकरांहीं दिसे गालिचा कीं हिची वाटिका
मराठी अशी ज्ञानदेवी जयाची असे मायबोली मराठीच तो
ह्र्दीं रक्त दे साक्ष तो बंधु माझा, कुठेंही असो उच्च वा नीच तो

मराठीस अन्याय कोठेंहि झाला, स्वदेशीं, विदेशीं कुणीं गांजिले
मराठी कसा मी न संताप माझा धडाडे जरी तीव्र दुःखानिले
मराठी जनांचेंच वर्चस्व राहो स्वत:च्या महाराष्ट्रदेशीं तरी
प्रसादें तुझ्या कोणती व्यक्त आशा करुं अन्य हे वंद्य वागीश्वरी?

- माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची