Loading ...
/* Dont copy */

मुक्त पक्षी - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची मुक्त पक्षी ही लोकप्रिय मराठी कविता.

मुक्त पक्षी - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

वेड आधी सांग कोणी लाविले


मुक्त पक्षी - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची मुक्त पक्षी ही लोकप्रिय मराठी कविता.



वेड आधी सांग कोणी लाविले
आणि डोळा गुज कोणी दाविले?

नेणता पक्षी मला पाहूनि तू
भोवती जाळे खुबीने टाकिले

शीळ ती अद्यापि या कानी घुमे
ज्या शिळेने प्राण माझे ओढीले

पार गेली मोकळीकीची स्मृती
पाठ दास्याचे तूवा जेव्हा दिले

मी ममत्वे रंगलो गेही तुझ्या
मी न जाई पाश होताही ढिले

आणि आता पारख्या सृष्टीत या
का मला वाऱ्यावरी तू सोडिले?

काय राने पाचूची आता मला
काय हे आकाश मौजेचे निळे?

- माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची