Loading ...

आमचे घर - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची आमचे घर ही लोकप्रिय मराठी कविता.

आमचे घर - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

आमुचे घर छान, शेजारी वाहे ओढा


आमचे घर - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची आमचे घर ही लोकप्रिय मराठी कविता.



आमुचे घर छान
शेजारी वाहे ओढा
कागदी होड्या सोडा
दूर जाती

चतुर नव्हे तर
अभ्रकी पंखांचे ते
विमान उडे तेथे
उन्हामाजी

उथळ वाहे पाणी
नितळ थंडगार
नाचता त्यात फार
मौज वाटे

पाहून अंग ओले
भरते रागे आई
मागून देई काही
खाऊ गोड

आमुचे घर छान
परसु लांब रूंद
मोगरा जाई कुंद
फुलतात

खोबरे झेंडूतील
मागतो सदा बाळ
झेंडूंचा पहा काळ
खोडकर

अडुळशाची फुले
देठात थेंब गोड
करितो गोड तोंड
मुलांचे तो

सोलून कोरफड
पाण्यात धुतां साफ
बर्फ हो आपोआप
काचेवाणी

आमुचे घर छान
म्हणती आम्हा द्वाड
करिती परी लाड
बाबा-आई

अंगणी सारवल्या
खडूने काढू शिडी
लंगडी चढोवढी
खेळायला

घरात जिन्याखाली
ताईचे घरकूल
खड्यांची थंड चूल
पक्वान्न दे

भांडून केव्हा केव्हा
म्हणतो जा! फू गडी!
लागेना परी घडी
एक व्हाया

आमुचे घर सान
आता ते कोठे गेले
बाल्याचे हे भुकेले
मन पुसे

- माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची