Loading ...

शुष्क कोरडं पान (मराठी कविता)

शुष्क कोरडं पान (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री दीपा दामले यांची शुष्क कोरडं पान ही मराठी कविता.

शुष्क कोरडं पान (मराठी कविता)

शुष्क कोरडं करडं पान, मंद झुळुकीने हेलावलं


शुष्क कोरडं पान (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘दीपा दामले’ यांची ‘शुष्क कोरडं पान’ ही मराठी कविता.



शुष्क कोरडं करडं पान
मंद झुळुकीने हेलावलं
तोडून नाळ हिरव्या फांदीशी
धरतीकडे झेपावलं

अचानक त्याच्या निखळण्याने
पोक्त फांदीलाही हेलावलं
खुशीत डूलणारं हसरं फूल
विरह व्यथेने दुखावलं

वार्‍याच्या कवेत पान मात्र
भिरभिर भिरभिर गिरकलं
जीवनक्रमाच्या पूर्णतेची
अनुभूती देऊन आनंदलं

अस्तित्वाचं नवं स्वरुप
समरसून त्याने अनुभवलं
गतासूनगतासुचे सत्य जाणून
संतोषाने मातीत विसावलं

सुंदर जगलं आणि बहरलं
सहज सुंदर हसत विरलं
स्मृतीवृक्षाच्या फांदी - फांदीवर
पुन्हा नव्याने पालवलं

- दीपा दामले

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची