Loading ...
/* Dont copy */

प्रेमस्वरूप आई - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची प्रेमस्वरूप आई ही लोकप्रिय मराठी कविता.

प्रेमस्वरूप आई - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई


प्रेमस्वरूप आई - मराठी कविता (माधव ज्यूलियन)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) यांची प्रेमस्वरूप आई ही लोकप्रिय मराठी कविता.



प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी?
गेली दुरी यशोदा, टाकुनी येथ कान्हा
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी, पान्हा तरीही वाहे
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे
नैष्ठुर्य त्या सतीचे, तू दाविलेस माते
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीप्य साधण्याते

नाही जगात झाली आबाळ या जिवाची
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका

विद्याधनप्रतिष्ठा, लाभे अता मला ही
आईविणे परी मी, हा पोरकाच राही
सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे
तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे

आई, तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे!
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे
किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोती
अव्यक्त अश्रुधारा, की तीर्थरूप ओती!

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई
पाहुनीया दुज्यांचे वात्सल्य लोचनाही
वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे!

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी!

- माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची