Loading ...
/* Dont copy */

बाबा आज रोजी (मराठी कविता)

बाबा आज रोजी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गौरांग पुणतांबेकर यांची बाबा आज रोजी ही मराठी कविता.

बाबा आज रोजी (मराठी कविता)

असा कसा रे बाबा… माझ्या आयुष्यात आलास


बाबा आज रोजी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गौरांग पुणतांबेकर यांची बाबा आज रोजी ही मराठी कविता.



बाबा तुझ्या आठवणीत सुचलेले काव्य...

असा कसा रे बाबा…
माझ्या आयुष्यात आलास
थोडसच पण पुष्कळसं
शहाणपण शिकवून गेलास
लहानपणापासून वेगळाच
भासत गेलास, दरवेळी नव्याने
मलाही उमगत आलास
असा कसा रे बाबा...

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणता
तुझं वेगळेपण दर्शवून गेलास
‘द्विध्रुवीय’ व्यक्तिमत्वा सामोरं जात
साधेपणाने जगत राहिलास
असा कसा रे बाबा...

आपलेपणाने सर्वांशीच हसतमुखाने
वागत आलास, परकेपणाचा भाव
मात्र स्वतःसोबत घेऊन गेलास
असा कसा रे बाबा...

वाद - संवादातून आशा - अपेक्षा
नेहमीच उंचावत गेलास
असाध्य, अकल्पनीय गोष्टींत
स्वतःच्याच विश्वात रममाण झालास
असा कसा रे बाबा...

तुझ्याशिवायचं माझं ‘बालपण’
माझ्या आठवणींतून कमी करत आलास
कर्तव्य आणि जबाबदारीची जाण
नकळत माझ्यावर सोपवून गेलास
असा कसा रे बाबा...


बाबा आज रोजी (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- गौरांग पुणतांबेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची