Loading ...
/* Dont copy */

बाप माझा खूप राबला (मराठी कविता)

बाप माझा खूप राबला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अ. ल. खाडे यांची बाप माझा खूप राबला ही मराठी कविता.

बाप माझा खूप राबला (मराठी कविता)

होता माझा बाप लहान तवा, माझ्या आजीनं देवाचं घर गाठलं


बाप माझा खूप राबला (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीअ. ल. खाडे’ यांची ‘बाप माझा खूप राबला’ ही मराठी कविता.



होता माझा बाप लहान तवा
माझ्या आजीनं देवाचं घर गाठलं
एवढ्याश्या लहान वयात माझ्या बापाचं
मायेचं पांघरुन फाटलं
पोटासाठी बापानं माझ्या पाटलांची गुरं राखलं मिळायची दहा - पाच त्यात कसबसं घर चालवलं
एवढ्या सगळ्या धडपडीत बापाचं माझ्या
शिक्षणाचं सपान अधुरंच राह्यलं
कामासाठी आज्यानं माझ्या त्याचं
शाळेत नावसुद्धा नाय घातलं
भाकरीची सोय करायला
बापाचं लगीन लवकरच उरकून टाकलं

अख्ख्या घरासाठी बाप माझा खूप राबलं
पण चुलत्याचं लगीन झाल्यावर घरात भांडण पेटलं
कपड्यानिशी बापाला माझ्या घराबाहेर काढलं
कष्ट करुन बापानं आम्हाला कसबसं जगवलं
शिक्षणाचं त्याचं सपान पुरं करायला
आम्हा पाचही भावंडांना शिकवलं
एकेकाची पुरत करता करता
बापाचं माझ्या अर्ध आंग नाही राहिलं
बापाला वाटतंय माझं पोरगं मोठा साहेब होतंय
अजूनही मला शिकवायासाठी
सहा महिनं उसतोडणीसाठी जातोय
बापाचं माझ्या कष्ट बघून मला मात्र रडायला येतंय

- अ. ल. खाडे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची