Loading ...

माझे म्हणू मी कुणा - मराठी कविता (प्रा.महेश बिऱ्हाडे)

माझे म्हणू मी कुणा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी महेश बिऱ्हाडे यांची माझे म्हणू मी कुणा ही कविता.

माझे म्हणू मी कुणा (मराठी कविता)

माझे म्हणू मी कुणा, माझेच सर्व हाच माझा गुन्हा


माझे म्हणू मी कुणा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी महेश बिऱ्हाडे यांची कविता ‘माझे म्हणू मी कुणा ’.



माझे म्हणू मी कुणा
माझेच सर्व हाच माझा गुन्हा

नाही कधी ना पुसली
कुणी माझी व्यथा
नाही जाणली माझी कथा
जो तो निघाला अतिशहाणा
माझे म्हणू मी कुणा

नाही विणले कुणी रेशमीबंध
दिखावा सारा, कसला ना धरबंध
कपट कारस्थाने लीलया सजती
कांगावा करुनी दावती दीनवाणा
माझे म्हणू मी कुणा

खेळ भावनेचा, अभिषेक प्रीतीचा
आयुष्य सरले आगडोंब भुकेचा
जिच्यासाठी जीवन उधळले
तिनेच गाडले जिवंत उताणा
माझे म्हणू मी कुणा

नव्हतं इथे कधी कुणा भान माझे
प्रत्येकाने फक्त वापरले धन माझे
आता कशाला ठेऊ इथे ओझे
शब्द शय्येवरूनच लावू द्या ठिकाणा
माझे म्हणू मी कुणा

प्रा.महेश बिऱ्हाडे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. तू मिटल्या पुस्तकाच्या त्या शेवटच्या
    कवितेते मी होतो..
    तु माळलास गजरा वेणीत त्या
    मोगऱ्यात मी होतो..
    तू रमलीस त्या मैफिलीत सखे
    नीट ऐकलं नाहीस वाटत
    तुला आवडलेल्या त्या
    गझलेत मी होतो...........
    तू लावलीस रोप
    भुतकाळा च्या पटलावर
    शेवटी लावलेल्या त्या
    पारिजातकाच्या सुगंधात मी होतो...
    फुलली तुझी प्रेमळ रोप सारी
    पण एक रोपटं उमलल न्हवतं
    त्या रोपट्यात मी होतो
    निसटून गेलेल्या तुझ्या हातातल्या
    त्या मातीत ही मी होतो...
    पाऊस खूप होता म्हणे
    प्रत्येक थेंबात थोडा थोडा बरसत होतो....
    तू मोहरलीस ज्या थेंबामध्ये त्या थेंबात ही मी बरसत होतो...
    गाडीच्या खिडकीत बसून आवडत गाणं ऐकत होतीस
    वाऱ्याच्या झुळकेने डौलणाऱ्या
    तुझ्या झुमक्यात सखे
    मी डौलत होतो.......
    शेवटच्या खंडा मधली
    ती कविता शेवटची
    वाचत होतीस..
    त्या कवितेत ल्या भावात सखे
    तुझ्या डोळ्यातुन मी वाहत होतो...
    शांत माझ्या आसमंतात
    शांत राहून च मी तुझ्या
    हास्याच गणित सखे
    मी सोडवत होतो...
    थकल्यावर कोणत्या वळणावर
    लागलीच जर मदत माझी
    तर हक्काने आवाज देशील
    मी काल ही तिथंच होतो
    आणि आज ही...

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची