Loading ...

अधिकारी होऊनच जाणार (मराठी कविता)

अधिकारी होऊनच जाणार (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अ. ल. खाडे यांची अधिकारी होऊनच जाणार ही मराठी कविता.

अधिकारी होऊनच जाणार (मराठी कविता)

पोर शिकाया जायचं म्हणून, मायनं पहाटेच स्वयंपाक


अधिकारी होऊनच जाणार (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी ‘अ. ल. खाडे’ यांची ‘अधिकारी होऊनच जाणार’ ही मराठी कविता.



पोर शिकाया जायचं म्हणून
मायनं पहाटेच स्वयंपाक
दोन वेळेसचा डबा मायेनं
सोबत बांधून दिला

लांब जायचं पोरगं म्हणून
माय रस्त्यापर्यंत आली
गळ्यात पडून ती माय माझी
ढसाढसा रडली

अभ्यास कर बाळा
कुणाच्या नादी नको लागू
कुणाच्या बहिणी - बाळीकडे
वाईट नजरेने नको बघू

असं म्हणत मायेनं पदराने
ओले डोळे पुसले
कणवटीचे शंभर रुपये
माझ्या खिशात तिने घातले

गावापर्यंत जाईपर्यंत माय
रस्त्याकडंच बघत होती
मागे वळून पुन्हा ती
हमसून हमसून रडत होती

एक एक दिवस करता
वर्षांमागून वर्ष सरली
तिने मात्र अजूनही मला
शिकवायची जिद्द नाय सोडली

तिला वाटतं एक दिवस मी
त्यांचं सगळ पांग फेडणार
एक दिवस तिच्यासमोर
अधिकारी होऊनच जाणार

बापाच्या कष्टाकडे बघून तिचा
जीव तीळ तीळ तुटतो
मला बघून मात्र तिच्या
थोडा जिवाला आधार वाटतो

- अ. ल. खाडे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची